Published On : Fri, Oct 22nd, 2021
By Nagpur Today Nagpur News

उडिशा राज्यातील जंगली हत्ती गडचिरोलीत दाखल

Advertisement

– हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

गडचिरोली : ओडिसातील 20 ते 22 च्या संख्येत असलेला हत्तींचा एक कळप छत्तीसगड मार्गे जिल्ह्याच्या सीमेत दाखल झाला आहे.कान्हारटोला येथील शेताची राखण करणाऱ्या अशोक मडावी या शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे याबरोबरच जिल्ह्यातील कोरची व धानोरा तालुक्यातील परिसरात घुसून धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही हत्तींच्या कळपाने केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून वाघांपाठोपाठ जिल्ह्यात रानटी हत्तींची दहशत नागरिकांमध्ये कायम आहे.

Advertisement
Today's Rate
Thursday 19 Dec. 2024
Gold 24 KT 76,000/-
Gold 22 KT 70,700/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ओडिसा राज्यातील जंगलांमध्ये रानटी हत्तीचे कळप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील एक कळप छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची व धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, येरकड जंगल परिसरात दाखल झाला असून असून सध्या ते धानोरा तहसीलच्या येरकड जंगल परिसरात भटकत असल्याची माहिती आहे जिल्ह्यात वाघांपाठोपाठ रानटी हत्तींचा वस्त्यांवर हमला होण्याच्या भितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हत्तींची दहशत निर्माण झाली आहे.

आठवडाभरापूर्वी जिल्ह्याच्या कोरची, कुरखेडा व धानोरा तालुक्यातील नागरिक अनभिज्ञ होते. त्यातच सात दिवसांपूर्वीच कोरची तालुक्यातील कोटगुल लगतच्या पिटेसूर गाव परिसरात 0 ते 22 च्या संख्येत असलेला रानटी हत्तीचा कळप आढळून आल्याने परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत.

याच कळपाने आपला हमला धानोरा तालुक्यातील मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील येरकड या गावालगतच्या जंगल परिसरात आढळून आले आहे. या हत्तीच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी वनविभाग सक्रीय झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. – सतीश कुमार,गडचिरोली

Advertisement