पुणे :माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षासोबत हातमिळवणी केली.यावरून शरद पवारांना अजित पवार यांच्या घरवापसीबाबत विचारण्यात आले.
त्यावर शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देऊन काही पत्ते राखून ठेवले आहेत.
अजितदादांसाठी घरात जागा आहे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर, घरात सर्वांनाच जागा आहे, असं शरद पवार म्हणाले.
तेव्हा, पक्षात अजितदादांना जागा असेल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावरही पवारांनी तात्काळ उत्तर दिलं. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात माझ्यासोबत जे मजबुतीने उभे राहिले त्यांना आधी विचारणार. घ्यायचे की नाही हे ते ठरवतील, असे म्हणत शरद पवार यांनी वेळ मारून नेली.