नागपूर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना बंद होणार का? या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे.मात्र या योजनेबाबत सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, ही योजना बंद होणार नसून, योजनेसाठी एकूण 3 हजार 826 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने महावितरणाकडे वर्ग केला.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी राज्य शासनाने महावितरणकडे 2 मोठे निधी वर्ग केले आहेत. यात पहिला निधी 2 हजार 26 कोटी रुपयांचा तर दुसरा निधी 1 हजार 800 कोटी रुपयांचा आहे.
दोन्ही एकत्रित एकूण 3 हजार 826 कोटी रुपयांचा निधी सरकारने महावितरणाकडे वर्ग केलाय. विशेष म्हणजे ही योजना 2029 पर्यंत सुरू राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी केली होती.