कामठी :-अलीकडच्या काळात सन, उत्सव, जयंती, लग्नसोहळा , मिरवणुका आदी डीजेच्या दणदणाट असल्याशिवाय साजरेच होत नाहीत या दणक्यावर तरुणाईचा थयथयाट देखील पहावयास मिळतो .डिजेचे दुष्परिणाम लक्षात घेता गनपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवन्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवली आहे तरीसुद्धा काळजाचा ‘ठोका ‘चुकविणारा डीजे आजच्या गणेशोत्सव मिरवणुकीत वाजणार का?तसेच गणेशवीसर्जन डिजेमुक्त राहणार का? असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे तर पोलिसांसाठी 12 सप्टेंबर गणेश विसर्जन हा परीक्षेचा वेळ ठरणार आहे.
डीजे डॉल्बी च्या दणक्यापुढे आजची तरुणाई ही पारंपरिक वाद्यापासून दूरावत चालली आहे यामुळे अराध्य दैवत असलेल्या गणेशोत्सवा मध्ये पारंपरिक तरुनाईला विसर पडत आहे .मोठा आवाज असणाऱ्या डीजे मुळे सर्वसामान्य नागरिक , वयोवृद्धांना , लहान बालकांना , हृदय विकार असनाऱ्या व्यक्तींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे .छातीत धडकी भरणाऱ्या कर्णकर्कश डिजेचा आवाज हा कधीकधी जीवघेणा सुद्धा ठरला आहे .
कामठी तालुक्यातील.शहरासोबत ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव साजरा केला जातो वास्तविकता या दहा दिवसीय उत्सवात समाजोपयोगी कार्यक्रम राबविले असते तर ते समाजोपयोगी ठरले असते तर अलीकडच्या काळात पारंपरिक वाद्य, संगीत ,लोककला, पौराणिक नाटके, नृत्यकला, एकपात्री प्रयोग, भजने, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमाकडे डीजे डॉल्बी च्या दणक्यामुळे दुर्लक्ष होताना दिसतो.हा उत्सव सुरू असताना गणेश मंडळांना गनपती आपले आराध्य दैवत आहे याचा विसर पडुन तरुणाई डीजेच्या दणक्यावर बेधुंदपणे थयथयाट करताना दिसते याचा त्रास मात्र ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’या म्हणीप्रमाणे परिसरातील सर्वसामान्य नागरिकाना त्रास सहन करवालागतो .
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डीजेच्या या जीवघेण्या आवाजावर उच्च न्यायालयाने निर्बंध लादले आहेत . वास्तविकता डॉल्बी चा आवाज नेमका किती डेसीबल आहे हे तपासण्यासाठी यंत्र आहेत तर आवाजाच्या मर्यादा बाबत न्यायालयाने काही नियम ठरवून दिले आहेत तेव्हा गणेशवीसर्जन डिजेमुक्त तथा इकोफ्रेंडली करून लोकोपयोगी करण्याची खरी गरज असली तरी 12 सप्टेंबर ला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त राहणार का?याकडे सर्वांचे लक्ष वेधले असून एकीकडे अनुयायांच्या भावना, दुसरीकडे न्यायालयिन आदेश यामध्ये पोलिसांसाठी खरी परीक्षेची वेळ आलेली आहे.
संदीप कांबळे कामठी