मुंबई : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. या भेटीनंतर भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ही भेट राज्यातील मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात असल्याची माहिती त्यांनी दिली.
ओबीसी आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडावा म्हणून यासाठी मी प्रयत्न करत आहे. यासाठी मी कोणालाही भेटायला तयार आहे.
उद्या मला वाटले की राहुल गांधी यांना भेटले पाहिजे. किंवा पंतप्रधान मोदी यांना भेटलं पाहिजे तर त्यांनाही भेटेल, असे भुजबळ म्हणाले.
मराठा-ओबीसींच्या प्रश्नांवर सध्या राज्यात मोठा वाद पेटला. त्यामुळे राज्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न केला पाहिजेत, असे सांगितले. त्यावर शरद पवार हे दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती भूजबळ यांनी दिली आहे.