मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना कठोर शब्दांत खडेबोल सुनावले. विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सांगा की ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाहीत.
तसेच नार्वेकरांना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं नवीन वेळापत्रक मंगळवारपर्यंत सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. यावर पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मी संविधानाला मानणारा व्यक्ती असल्यामुळे मी नक्कीच कोर्टाच्या आदेशांचा आदर ठेवीन. पण विधिमंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचं सार्वभौमत्व कायम ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांचाही आदर राखणं तेवढंच आवश्यक आहे, असे राहुल नार्वेकरांनी नमूद केले.