मुस्लीम कब्रस्तान समिती शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी मुस्लिम कब्रस्तान संबंधी येणा-या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगीतले की, नागरिकांना कोरोनामुळे होणा-या मृत्यूला रोखण्यासाठी प्रयत्न करायचे आहे.
श्री. मुंढे नागपूरातील मुस्लीम कब्रस्तांन समितीचे पदाधिका-या सोबत मंगळवारी चर्चा करीत होते. अति. आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे तसेच आरोग्य अधिकारी डॉ. दासरवार यावेळी उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी आवाहन केले की ताप, खोकला,शिंका असल्यास किंवा पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोरोनाची चाचणी केली पाहिले. क्षयरोग, मधुमेह, रक्तदाब चा ज्यांना विकार आहे. त्यांनी सुध्दा चाचणी करायला पाहिले. वयोवृध्द नागरिकांनी देखील याचा लाभ घ्यायला पाहिजे. या चाचणी साठी मनपाच्या २१ कोविड चाचणी केंद्राचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांनी सांगीतले की कोरोना पासून होणा-या मृत्यू चा सामना करण्यासाठी नागरिकांनी कोविड-१९ चे दिशानिर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे.
कब्रस्तानचे पदाधिका-यांनी त्यांना भेडसावणारी समस्या जसे दफन विधी करण्यासाठी १२ फुटाचा गड्डा करणे,कब्रस्तान मध्ये जागांची कमतरता होणे संबंधी माहिती दिली. आयुक्तांनी त्यांच्या मागण्याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याबाबत मनपा तर्फे नोडल अधिकारी म्हणून डॉ. बहीरवार असल्याचे सांगून अडचण आल्यास त्यांचेशी संपर्क करण्याचे सांगीतले. याचर्चेत माजी नगरसेवक कामिल अंसारी, मो. कलाम, अमान खान, अशफाक पटेल, अजीज भाई, हफीज अशफाक अली, अब्दुल कादीर, डॉ. सरुफराज, इसराइल अहमद इत्यादी सहभागी झाले.