मुंबई : वक्फ सुधारित विधेयक बुधवारी (२ एप्रिल) आज लोकसभेत १२ वाजता सादर करण्यात आला. या वक्फ सुधारित विधेयकावरून मंगळवारी लोकसभेत गदारोळ झाला. विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही काळासाठी कामकाज तहकूब केले होतं. या विधेयकावरून विरोधकांकडून विरोध होत आहे, अशातच हे सुधारित विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावरुन शिवसेनेला (उठाबा) डिवचणारा सवाल उपस्थित केलाय. या विधेयकावरुन बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?” असा सवाल पोस्टद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टसंदर्भात शिवसेना (उबाठा) माजी खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले ,आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जे याबाबत आदेश देतील, ते आदेश सभागृहात आमचे खासदार पाळतील. परंतु वक्फ सुधारणा विधेयकाबाबत जी जेपीसी समिती नेमली होती. त्या समितीमध्ये आमचे खासदार अरविंद सावंत यांनी जी भूमिका मांडली होती. त्यांनी जे जेपीसी समितीला सांगितले होते. तीच आमच्या पक्षाची भूमिका कायम असेल,अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे