नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी भाजपच्या उमेदवारांच्या नामांकनात सहभागी झाले. नामांकनादरम्यान फडणवीस यांनी नागपूर शहरातील सहाही जागांवर विजयाचा दावा करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
फडणवीस म्हणाले की, गेल्या वेळी काही मते आणि खोट्या विधानामुळे आम्ही दोन जागांवर मागे पडलो होतो, मात्र यावेळी काँग्रेसचा सफाया करू.यासोबतच कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी प्रचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. तसेच या निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. आम्हाला विजयाबाबत पूर्ण विश्वास आहे. बाकी मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे आम्ही किती जागा जिंकू याबातत आकडा सांगणार नाही. या निवडणुकीत महायुतीकडे अनुकूल वातावरण आहे. मात्र भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि आम्ही मित्रपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करू एवढं बहुमत आम्हाला मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस म्हणाले.