Published On : Wed, Nov 22nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

एशियन मास्टर्स स्पर्धेतील विजेत्यांचा मनपातर्फे सत्कार

Advertisement

नागपूर : फिलिपिन्स येथील न्यू क्लार्क सिटी येथे पार पडलेल्या एशियन मास्टर्स स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात सहभागी नागपूरकर खेळाडूंचा नागपूर महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपायुक्त श्री. सुरेश बगळे, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांच्यासह मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन नागपूर जिल्हाचे पदाधिकारी उपस्थित होते.

८ ते १२ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान फिलिपिन्स येथील न्यू क्लार्क सिटी येथे एशियन मास्टर्स स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जगभरातील २३ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. भारतातील २५७ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला यामध्ये नागपुरातील १२ खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेत भारताने सर्वाधिक पादकांसह प्रथम स्थान पटकावले. विजेत्या भारतीय संघाने ७० सुवर्ण, ६३ रौप्य आणि ८२ कांस्य असे एकूण २१५ पदकांची कमाई केली. स्पर्धेत जपान दुसऱ्या आणि फिलिपिन्स तिसऱ्या स्थानावर राहिले.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारतीय संघात नागपुरातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. नागपुरातील खेळाडू सिमा अख्तरने २ सुवर्ण पदक (२००० मी स्टीपल चेस, १० किमी दौड, ५०० मिटर हर्डल्स), रेणू सिद्धूने २ रौप्य आणि ३ कांस्य पदक (२००० मिटर स्टीपल चेस, १० किमी दौड, ८०० मीटर दौड, ५ किमी दौड, ४x१०० मीटर रिले), शारदा नायडूने २ कांस्य पदक (२००० मी. स्टीपल चेस, उंच उडी), अलका पांडेने १ कांस्य पदक (ट्रीपल जम्प), दत्ता सोनावालेने १ कांस्य पदक (३००० मिटर स्टीपल चेस, १० किमी. दौड मध्ये पाचवे स्थान) पुष्पा झाडेने हाथोडा फेक स्पर्धेत सातवे स्थान तर अक्रम खानने ८०० मीटर दौड, ४०० मीटर रिलेमध्ये ५ वे स्थान पटकाविले.

१४ ते १८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स फेडरेशनद्वारे ४३व्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे ४५०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची फिलिपिन्स येथील एशियन मास्टर्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये नागपुरातील १२ खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर एशियायी स्पर्धेत स्थान मिळविले.

Advertisement