Advertisement
नागपूर : हिवाळा सुरू झाला तरी काही दिवसांपासून नागपुरातून थंडी अचानक गायब झाली होती. मात्र आता शहरात पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले आहे.
सोमवारी शहराच्या किमान तापमानात 3.2 अंश सेल्सिअसने घसरण नोंदवून 16.0 अंश सेल्सिअसवर स्थिरावले. संध्याकाळच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अनेक नागरिक आजपासून स्वेटर व इतर उबदार कपडे परिधान केलेले पहायला मिळाले. तर दिवसाचे कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस होते. दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मुसळधार पाऊस पडला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातवरण निर्माण झाले.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शहराच्या किमान तापमानात 12 अंश सेल्सिअसपर्यंत मोठी घसरण नोंदवली गेली होती परंतु आता या महिन्यात ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे.