नागपूर : गेल्या काही दिवसंपासून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीकेची झोड उठवित आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेनंतर काल भजपने नागपूरच्या झाशी राणी चौकात आंदोलने केली.
त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज उद्धव ठाकरे गटाने शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुधवारी दुपारी व्हरायटी चौकात माजी खासदार प्रकाश जाधव व जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात भाजप विरुद्ध आंदोलन करण्यात आले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेला फलक फाडण्यात आला. हातात भगवे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. तसेच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात ही घेतले आहे.
भाजपकडून होत असलेल्या राजकारणाने राज्याला कलंक लागला आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलने, प्रेतयात्रा असे प्रकार करण्यात आले तर त्याला जशाच तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला.