Published On : Mon, Jan 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

‘वो काट…’ नागपुरात सर्वत्र मकरसंक्रांतीचा उत्साह, रंगबिरंगी ठिपक्यांनी रंगले आकाश !

Advertisement

नागपूर : मकरसंक्रांतीनिमित्त आज शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संक्रातीला सारे आकाशच रंगबिरंगी ठिपक्यांनी रंगलेले असते त्यामुळे पतंगोत्सवाचा उत्साह तरुणाईमध्ये दिसून येत आहे. बच्चे कंपनीसहच मोठ्यांनीही घराच्या गच्चांवर तयारी करून ठेवली आहे. डीजे आणि संगीताच्या तालावर ‘ढील दे दे रे’ असे म्हणत, प्रत्येकजण पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. आज दिवसभरच ‘वो काट…’ असे सतत ऐकू येणार आहे. नागपुरात ठिकठिकाणी मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक भागात ओ-काट असे ओरडण्यासाठी माइकची व्यवस्था करण्यात आली.

मकरसंक्रांतीचे महत्त्व –
मकरसंक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे दान करणे विशेष महत्त्वाचे आहे. तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असते. दोन्हींचे मिश्रण सामाजिक संघटन, समरसता आणि पूरकता यांचे प्रतीक असते. या दिवशी खिचडी बनवण्याची पद्धतही आहे. महाभारतात दृष्टांत दिला आहेे की, पांडवांच्या वनवासाच्या वेळी मकरसंक्रांतीच्या दिवशी त्यांना भिक्षेमध्ये तांदुळ, डाळ आणि तीळ इत्यादी मिळाले होते.

सर्व पदार्थ एकाच पात्रात मिसळले गेले होते; म्हणून त्यांनी ते सर्व पदार्थ एकत्रच शिजवून खाल्ले. त्या दिवसापासून ‘खिचडी’ बनवणे आणि मकरसंक्रांतीच्या दिवशी दान करण्याची प्रथा चालू झाली आहे.मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्‍या कृती आहेत.

Advertisement