नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून एका महिलेची ३७ लाख ४८ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. माहितीनुसार, गोधनी रेल्वे, मानकापूर येथील रहिवासी फिर्यादी पूजा अग्रवाल (४३) या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप मॅसेज आला.
ओम एलआयकॉम एमइंडियाएन ग्रुप ह्युमन रिसर्चचा कर्मचारी असल्याचे त्याने सांगितले. युट्यूबवर लाईक करण्याचे काम दिले. दिलेल्या अवधीत काम पूर्ण झाल्यास चांगला परतावा मिळणार असे आमिष सायबर गुन्हेगाराने महिलेला दिले. महिलेने त्याचे काम पूर्ण केले.
जा यांना क्रिप्टो करन्सी या फर्मवर खाते उघडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यामुळे पूजा यांनी ३७ लाख ४८ हजार रुपयाची गुंतवणूक केली. ती रक्कम ऑनलाईन पाठविली. यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी पूजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु केला आहे.