नागपूर : सदर येथील बँकेत ग्राहकाच्या बॅगेतून दोन लाखांची रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील राजगढ येथील पिंकी विजय सिसोदिया असे या २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. बँक कर्मचाऱ्यांनी तिला चोरी करताना पकडल्यानंतर सदर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश राजन चक्कल (वय 58, रा. संताजी सोसायटी, बेलतरोडी) हा नायर कंपनीच्या सर्व्हिस विभागात काम करतो. शुक्रवारी दुपारी राजेशने सदर येथील पंजाब नॅशनल बँकेतून रोख रक्कम काढून बॅगेत ठेवली. संधी साधून पिंकीने सावधगिरीने ब्लेडने बॅग उघडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सतर्क बँक कर्मचाऱ्यांनी तिची कृती लक्षात घेतली आणि तिला पकडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिंकीला अटक केली. सदर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ आणि ५११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.