नागपूर : वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात एसटीच्या महिला कर्मचाऱ्याने आजपासून उपोषण सुरू केले. उपोषण करणारी महिला कर्मचारी नागपुरातील विभागीय नियंत्रक कार्यालयात कार्यरत आहे. एकदा ती विभाग नियंत्रकाकडे फाईल घेऊन गेली असता त्यांनी तिच्यावर कारण नसतानाही त्यांनी तिचा अपमान केला.
या विषयाची तक्रार तिने एसटी महामंडळातील वरिष्ठ पातळीवर केली. त्यावर एका समितीकडून चौकशी झाली. समितीने नोंदवलेल्या जबाबात या घटनेच्या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी येथे असली घटनाच घडली नसल्याचे लेखी स्वरूपात लिहून दिले.
या कर्मचाऱ्यांना विद्यमान विभाग नियंत्रकांच्या हाताखाली काम करावे लागल्यामुळे कोणीच नियंत्रकाच्या विरोधात बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे महिला कर्मचारीने उपोषण करण्याचे ठरविले. या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याचाही इशारा तिने दिला.