कामठी : शहरालगतच्या येरखेडा ग्रामपंचायत च्या सरपंच मंगला व त्यांचे पती माजी सरपंच मनिष घनश्याम कारेमोरे यांनी गावातील एका महिलेला अवाच्य भाषेचा वापर करून अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती व जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
सविस्तर असे की, येरखेडा येथील रहिवासी असलेली ३१ वर्षीय प्रेमा सिद्धार्थ सोनारे ही महिला पंचायत समिती अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बचत गटाच्या सीआरपी (संसाधन समन्वय व्यक्ती) चे अध्यक्ष पदावर मानधन तत्वावर मागील सात वर्षांपासून काम करते. तिच्या कडे २५ बचत गटाच्या कारभार पाहण्याची जबाबदारी आहे. मागील सहा महिन्यापूर्वी मनिष कारेमोरे व त्यांच्या पत्नी मंगला कारेमोरे यांच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त होऊन तक्रारदार महिलेची त्यांच्याशी बोलणे बंद केले.यामुळे सरपंच मंगला व तिचे पतीने मानसिक त्रास देणे सुरू केले. यादरम्यान ३० मे रोजी दुपारी तीन वाजता कळमना मार्गावरील पंकज मंगल कार्यालय चौकातून तक्रारदार जात असताना एका युवकाने मोटार सायकलनी धडक दिली होती.त्या युवकाला काहींनी पकडून विचारपूस केली असता त्या युवकाने मनीष करामोरे यांनी पाठविले असल्याचे सांगितले होते.
याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. दुसरी घटना येरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील भारत टाऊन येथील आंबेडकर चौका जवळून बचत गटाच्या कामाने तक्रारदार जात असताना त्याच वेळी त्या मार्गावरून दोघेही पती पत्नी मोटारसायकल नी येऊन तिला थांबऊन म्हणाले की तू किती दिवस सी आर पी ची अध्यक्ष रहाते ते बघतो मी सरपंच आहो तुला ठेवणे नाही ठेवणे माझ्या हातात आहे. तू जातीची महार आहे हे विसरू नको. अश्या प्रकारे जातीवाचक शब्दाचा उपयोग करून भांडण केले व जिवे मारण्याची धमकी दिली.
सोबतच बचत गटाच्या महिलांना तक्रार दाराच्या विरोधात गैरसमज निर्माण करून त्या महिलांना तक्रारदाराला साथ न देण्याची तंबी दिली. व सहा दिवसांपूर्वी काही बचत गटाच्या महिलांना सोबत घेऊन गटविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन तक्रारदार प्रेमा सोनारे यांच्या विरोधात खोटी तक्रार करण्यात आली. या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर या महिलेने पोलिस स्टेशन गाठले. नवीन कामठी पोलिसांनी तक्रारदार महिलेची रीतसर तक्रार घेऊन येरखेडा ग्रामपंचायत च्या सरपंच मंगला व त्यांचे पती माजी सरपंच मनिष घनश्याम कारेमोरे यांनी गावातील एका महिलेला अवाच्य भाषेचा वापर करून अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती व जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
संदीप कांबळे कामठी