कामठी – महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध महत्त्वकांशी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी नगर परिषदेच्या वतीने आयोजित केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र शासन अतंर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान कामठी नगर परिषद तर्फे घेऊया एक उंच भरारी कार्यक्रम मध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले .
कामठी राजीव गांधी सभागृहात दिनांक 23 मार्च रोजी शहरी उपजिवीका केंद्राचे (CLC) तसेच महिला बचतगटांना कर्ज वाटप
आणि महिला बचत गटांना शिलाई मशीन , धनादेश वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले, यावेळी उद्योगपती अजय अग्रवाल , नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय कदम, शहर भाजपा अध्यक्ष राज हडोती, राजेश खंडेलवाल ,रामजी शर्मा ,प्रतीक पडोळे,प्रमोद वर्णम ,उपविभागीय महसूल अधिकारी सचिन गोसावी ,तहसीलदार गणेश जगदाळे ,मुख्य अधिकारी संदीप बोरकर, प्रदीप तांबे, माजी नगरसेविका माधुरी गजभिये ,वैशाली मानवटकर, प्रशांत मानवटकर उपस्थित होते ,कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मनाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला असून त्यांच्याच माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध महत्त्वकांशी योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन रेडीमेड गारमेंट सह विविध प्रकल्प उभारून रोजगाराचे साधन उपलब्ध करण्याचे आव्हान केले रोजगारासाठी आपण मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले,
या वेळेस 125 महिला बचत गटातील महिलांना शिलाई मशीन , रोजगारासाठी धनादेशाचे वितरण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .