मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा या सभेच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
हा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून 5 मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देण्यात येतील. यासह, शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या ‘या’ 5 प्रमुख घोषणा-
1. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
2.शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन. 3. जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
4. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
5. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.