नागपूर : आंतराष्ट्रीय महिला दिवस च्या निमित्ताने AHPWI तर्फे ९ मार्च सकाळी ७ ते ९ वाजे पर्यंत रामगिरी मुख्यमंत्री निवासाच्या समोर वॉकर झोन, सिविल लाईन्स येथे रॅली आणि महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच संगठनचे प्रमुख प्रदीप कुमार चंदेल, सह पोलीस आयुक्त श्रीमती अस्वती दोरजे , मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यावेळी संगठन चे प्रतिनिधी पथ नाट्य सादर करतील.