– माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे मित्र परिवारा तर्फे आयोजन
वाडी: महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती दिनी माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे मित्र परिवारातर्फे वाडी स्थित रामकृष्ण सभागृह येथे संक्रांत उत्सव व महिला कोरोना योद्धा चा सत्कार मोठ्या उत्साहात रविवारी संपन्न झाला. मेळाव्याचे उदघाटन दीपप्रज्वलन करून व माँ जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून नागपुर जि.प.च्या माजी अध्यक्षा सुनीताताई गावंडे यांच्या हस्ते तर,हिंगण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या कुमुद घोडमारे,आयोजिका प्रज्ञा झाडे,जयश्री हुसणापुरे,अ.भा.काँग्रेस समितीच्या सदस्या कुंदाताई राऊत,जि.प.सदस्या ममता धोपटे,माजी नगराध्यक्ष प्रतीक्षा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत शिक्षण समुपदेशिका प्रतीमा मोरे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महान स्त्रियांच्या इतिहासाची ओळख व्हावी व कोरोना काळात ज्या महिलांनी समाजाची दिवस-रात्र सेवा केली त्यांचा सन्मान व्हावा हा उद्देश असल्याचे प्रस्तुत केले.
तदनंतर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका लिना निकम,कुंदा राऊत,ममता धोपटे, यांनी उपस्थित महिलांना आज महिला भारतीय संविधानाने दिलेल्या अनेक अधिकारांचा वापर करून सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगून महिलांनी ही सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रात क्रियाशील राहण्याचे मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी सुनीता गांवडे यांनी ही महिलांना अंधश्रद्धा सारख्या नुकसान दायक प्रथा दूर करून माता रमाई ,जिजाऊ,सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेऊन प्रगती साधण्याचे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मंचकावर आयोजिका जयश्री हुसणापुरे,मेघना मंडपे,नंदा नरवाडे, प्रमिला पवार,जया देशमुख,दुर्गा आवारे,दयावनंती मासुरकर,हेमलता राजूरकर,स्मिता खोब्रागडे,प्रेरणा क्षीरसागर,इंदू काकडे,सौ.कीनकर इ.विराजमान होत्या.या प्रसंगी कोरोना काळात निरंतर सेवा प्रदान करणाऱ्या कोरोना योद्धा महिला डॉ.सुषमा धुर्वे,संगीता चौधरी,सरोज लोखंडे,मृनमयी जोध,भारती माडेकर यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सरिता गडेकर,साधना सोनेकर,देवकण्या मेश्राम,मीनाक्षी पाटील,शालू कोकाटे,दुर्गा जुनघरे,संगीता फ्रान्सिस,सह हजारो च्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचलन कविता सूर व आभार आयोजिका प्रज्ञा झाडे यांनी व्यक्त केले.उपस्थित सर्व महिलांना संक्राती निमित्य आयोजका तर्फे भोजनदान व भेटवस्तू ही देण्यात आल्या.