नागपुर – महाराष्ट्रात साकीनाका येथे महिला अत्याचार संबंधित घडलेली घटना असो, कल्याण-डोंबिवली मध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार किंवा सीताबर्डी (नागपूर) येथील एका अल्पवयीन मुलीवर केलेला अत्याचार असो, महाराष्ट्रात महिला, मुलीवर अत्याचार हे वाढतच आहे.
यामुळे जनसामान्यांमध्ये व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायदा आहे परंतु कायद्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही. कायदा कडकपणे राबविला तर कुणाची हिम्मत महिला वर नजर उचलण्याची होणार नाही परंतु कुठलाही ठोस निर्णय आपले सरकारे घेत नाही त्यामुळे महिलांनी कुणावरही अवलंबून राहू नये .
आतापर्यंत महिलावर किती अत्याचार झाले मोर्चे आणि मेणबत्त्या जाळून होणार नाही. महिलांनी स्वतःला सक्षम व्हावे. महिला व मुली यांच्या मनातून भीती दूर व्हावी व महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे, खंबीर बनावे यासाठी नवरात्री उत्सव निमित्ताने शिवकालीन लाठीकाठी प्रात्यक्षिके सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या अध्यक्षा, रणरागिणी जनकल्याण संस्थापक अध्यक्षा सौ मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात आज दि. 5 ऑक्टोंबर 2021 रोजी सायं. 4.30 वा. सक्करदरा चौक मराठा समाज भवन येथे पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक सन्माननीय धनंजय पाटील साहेब सक्करदरा पोलीस स्टेशन तसेच राज ताज हिरा आखाड्याचे प्रमुख प्रभाकर राव भोसले पोलीस उपनिरीक्षक किशोर डांगोरे, मनसेच्या जिल्हा अध्यक्ष अचला ताई मेसन, विभाग दक्षिण अध्यक्ष मंजुषा पानबुडे,पूनम चाडगे , स्वाती जयस्वाल, मनीषा पहाड, शालू इंगळे, राज बहिर, विकास वांदे, साहिल पापडकर, आनंद पापडकर, संकेत मसराम अजिंक्य कोरडे विक्रम भोसले, आनंद भोसले , असंख्य नागरिक व मनसे सैनिक, पोलीस कर्मचारी व आखाड्यातील सर्व विद्यार्थी बंधू-भगिनी यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच संपूर्ण नागपूर शहरांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक बगीच्यामध्ये मनसे महिला सेनेचं तर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येईल हा उपक्रम मनसेच्या महिला शहर अध्यक्षा मनीषा पापडकर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताज राज हिरा आखाडा नागपुर यांचे आम्हाला विशेष सहकार्य लाभले.