मुल: श्रमिक एल्गार संघटनेच्या वतीने १ मे कामगार दिनानिमित्त श्रमिक एल्गार मुल तालुका अधिवेशन अँड पाराेमिता गाेस्वामी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. अँड. गाेस्वामी यांनी आपल्या भाषनातुन सरकारवर ताशेरे आेढले तालुक्यात अनेक प्रश्न असुन मुल तालुक्यावर अन्याय हाेत आहे. निराधारांना किमान हजार रुपये हि सरकार देवु शकत नाही, बांधकाम मजुरांचा निधि असतांना त्यांना काेनतीही सुविधा मिळत नाही, शेतकऱ्यांना पट्टे नाही, तालुक्यात अनेक गावात बस नाही, वन्य प्राण्यापासुन झालेलीशेतीची नुकसान भरपाई मिळत नाही, वेंडर अँक्ट लागु हाेत नाही, उज्वला गँसचा भ्रष्टाचार दुर करत नाही, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केल्या.
कामगार दिना निमित्त अनेक बांधकार मजुरांचा सत्कार करुन बांधकाम मजुराचा नाेंदणी अर्ज भरुन कामगार दिनी शुभारंभ करण्यात आला. अनेक यावेळी वर्धा येथिल दारुबंदीचे कार्यकर्ते गाेविंदराव पेटकर , यवतमाळ येथिल स्वामिनी संघटनेचे मा. महेश पवार, मनाेज कनकम घुगुस , पप्पु देशमुख म.न.पा. नगरसेवक चंद्रपुर, व बाधकाम मजुरांचा शाल, श्रिफळ, मानपत्र देवुन ताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणुन ग्रामगीताचार्य प्रा.बडाेपंत बाेढेकर, मा. विजय सिद्धावार उपाध्यक्ष, रवि शेरकी मुल तालुका अध्यक्ष, विजय काेरेवार सावली पंचायत समिती सदस्य, वराेरा तालुका उपाध्यक्ष रेवतीताई ईंगाेले, अरुण खाेब्रागडे, विराचे तालुका अध्यक्ष गाैरव शामकुळे, अनिल शेंडे, विवेक मुत्यालवार, अमित राऊत पत्रकार, बांधकाम मजुर कमेटीचे अध्यक्ष राहुल प्रेमलवार ,हे उपस्थित हाेते यावेळी महेश पवार, गाेविंदराव पेटकर, विजय सिद्धावर, विजय काेरेवार, रवि शेरकी, यांची भाषने झाली अधिवेशनात अनेक विषयावर ठराव मांडण्यात आले.
प्रास्ताविक महासचिव छाया सिडाम तर संचालन महासचिव घनशाम मेश्राम, यांनी केले आभार प्रदर्शन रवि नैताम तर यशस्वितेसाठी अमर कड्याम, संगिता गेडाम, सपना कामडी, वंदना मांदाडे, विशाल नर्मलवार, रुपेंद्र तेलंग, माेनी कुळमेथे, भावना वाटेकर, राकेश काेडापे यांनी प्रयत्न केले. राष्टगिताने समाप्त करण्यात आले.