नागपूर : १३ व्य औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य महोत्सवाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले असून या नाट्यमहोत्सवात महावितरणच्या नांदेड परिमंडळाने सादर केलेल्या ‘नजरकैद’ या नाटकाला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला तर नागपूर परिमंडलाच्या वतीने येत्या गुरुवारी २३ फेब्रुवारीला अचानक या नाट्याचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
राजे रघुजी नगर येथील कामगार कल्याण भवनात या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी ला सायंकाळी ६.३० ‘अचानक’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाचे निर्माते मुख्य अभियंता दिलीप दोडके असून दिग्दर्शन कार्यकारी अभियंता हेमराज ढोके यांचे आहे. नाटकात अभय अंजीकर,अनुजा पत्रीकर,अविनाश लोखंडे,निशा चौधरी,शशांक डगवार,अशित रामटेके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या नाट्य महोत्सवात महावितरणच्या नांदेड परिमंडलाच्या वतीने १६ फेब्रुवारीला ‘नजरकैद’ हे नाटक अत्यंत दमदारपणे सादर करण्यात आले. अभिजित वाईकर लिखित व प्रमोद देशमुख दिग्दर्शित या गूढ नाट्याला रसिकांनी जोरदार दाद दिली. नाटकातील प्रमोद देशमुख यांची भूमिका सर्वाधिक लक्षणीय ठरली. तसेच पूर्वा देशमुख, सतीश निशाणकर, सौ. बागूल, बाबू लोखंडे,नागेश कडतन ,चंद्रकांत वाठोरे व गिरीश डोणगांवकर यांनाही उत्कृष्ट अभिनय केला.
२३ फेब्रुवारी ला सायंकाळी ६.३० ला आयोजित ‘अचानक’ या नाटय प्रयोगाला मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.