Published On : Thu, Mar 8th, 2018

औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करुन पायोनियर पार्कमध्ये साजरा झाला जागतिक महिला दिन

Advertisement


नागपूर: पर्यावरण संवर्धनासोबतच औषधी वनस्पतींच्या विविध प्रजातींचे संगोपन करण्यासोबतच औषधी वनस्पती असलेल्या झाडांची एकत्र माहिती उपलब्ध व्हावी यासाठी पायोनियर रेसिडन्सी पार्कमध्ये वनस्पती उद्यान विकसित करण्याचा अभिनव उपक्रम जागतिक महिला दिनी सुरु करण्यात आला. यावेळी आवळा, पानफुटी, अडुळसा, निरगुडी, शतावरी, गिलोई, लेंडीपिपरी, गुडमार्क, इन्शुलिन, ब्राम्हणी, पथरचट्टा, अश्वगंधा, पारिजात आदी औषधी गुणधर्म असलेल्या विविध प्रजातींचे वृक्ष लावण्यात आले.

वर्धा रोडवरील पायोनियर रेसिडन्सी पार्क येथील महिलांनी औषधी गुणधर्म असलेल्या विविध प्रजातींचे वृक्ष लावून तसेच प्रत्येक घरात किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. यावेळी नगरसेविका श्रीमती वनिता दांडेकर, तसेच हृदय योगाअभ्यासी मंडळाच्या प्रमुख व योगगुरु श्रीमती सरस्वती राव यांनी औषधी वनस्पती वृक्ष लावून महिलांना संवर्धन करण्याची शपथ दिली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण संस्थेचे आशुतोष श्रीवास्तव, ओमप्रकाश राठी, गजानन दुबे, शासकीय अधिवक्ता ॲड. वर्षा साईखेडकर, उजव्ला दोडके, कामिनी पडेगावकर, जयश्री दुबे, निता गडेकर, सुनंदा उघाडे, मालुंजकर, हेमा हिंगवे, मिरा जयस्वाल, श्रीमती कोतवाल, श्रीमती तिडके आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करताना औषधी गुणधर्म असलेली वृक्ष लावण्याचा संकल्प करताना प्रत्येक घरामध्ये दैनंदिन आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पाच प्रजातींची वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे ह्दय योगअभ्यासी मंडळाच्या श्रीमती सरस्वती राव यांनी यावेळी सांगितले. तसेच औषधी गुणधर्म असलेल्या प्रजाती घरातील परसबागेत लावण्यासाठी यावेळी वितरीत करण्यात आले. हृदयरोग, डायबिटीज, अस्थमा, कंबरदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला आदी आजारावर तात्काळ उपचारासाठी अशा औषधी गुणधर्म असलेल्या प्रजाती परसबागेतच लावून संगोपन करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचलन ॲड. वर्षा साईखेडकर यांनी केले.

Advertisement
Advertisement