Published On : Thu, Jun 7th, 2018

महापौरांनी घेतला योग दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा

Advertisement

नागपूर: दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ जुन रोजी जागतिक योग दिन नागपूर महानगरपालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेतला.

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त वीरेंद्र सिंह, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, उपनेते वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हूमने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी होणा-या संस्थेची काय तयारी आहे, याचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. कार्यक्रमात किती साधक उपस्थित राहील त्यांची काय व्यवस्था करण्यात आली आहे. याचाही आढावा महापौरांनी यावेळी घेतला. पावसाळा सुरू आहे. कार्यक्रमादिवशी जर पाऊस आला तर कार्यक्रमाची पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

दरवर्षी नागपूर महानगरपालिका जागतिक योग दिवसाचा कार्यक्रम हा जनार्दन योगाभ्यासी मंडळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यासह इतर योग संस्थेच्या सहकार्याने होत असतो. यावर्षीही सर्व योग संस्थेच्या सहकार्याने जागतिक योग दिनाचा कार्यक्रम घेण्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली.

बैठकीला यावेळी जनार्दन योगाभ्यासी मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, ओशोधारा संघ नागपूर, आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूर, नागपूर जिल्हा हौशी योग संघटना असोसिएशन नागपूर यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement