कन्हान : – भारत देश हा संविधाना मुळेच सार्वभौमत्व समता, बंधुत्व व न्याय प्रधान देश आहे. या देशातील लोकांना संरक्षण व सुरक्षा देण्याचे कार्य संविधानाच्या रूपाने मिळालेला आहे. संविधानाच्या एक एक कलम अन्याया विरुद्ध लढण्याची ताकद व हक्क देत असुन आम्ही या देशातील नागरिक जर सुरक्षित व निडरपणे जगत आहोत तर ते संविधानाच्या कलमा मुळेच.
आज देशा तील अनेक संघटना, लोक हे लोहशस्त्र रुपी जसे की तलवार, चाकु, भाले, बिचवे तसेच बंदुकांचे पुजन करतात. यास्तव परिवर्तन म्हणुन सत्यशोधक संघ कन्हान व्दारे माता रमाई वाचनालय येथे भारतीय संविधानाला पुष्प अर्पण व पुजन करून आपल्या अधिकारा करिता ” भारतीय संविधान ” अन्यायाविरुद्ध लढण्याचे शास्त्र म्हणुन घोषित करण्यात आले. आज या देशांमध्ये असहिष्णुता व अराजक्ताचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यास जर थांबवयाचे असेल तर एकमेव फक्त भारतीय संविधान आहे. आज देशाला संविधानाला भक्कम व आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे. या करिता खऱ्या अर्थाने सत्यशोधक संघाने ” भारतीय संविधान ” पुजन कार्यक्रमाने सुरूवात केली आहे. या प्रसंगी प्रामुख्याने सतिश भसारकर, स्वप्निल वाघधरे, मनीष भिवगडे, प्रवीण शेलारे, धर्मेंद्र गणवीर, नितीन उके, मधुकरजी गणवीर, दिनेश नारनवरे, गौतम नितनवरे, अतुल ढोके , मोंटू राऊत सहित सत्यशोधक संघाचे कार्यकर्ता गण उपस्थित होते. भारतीय संविधानाची प्रस्तावने चे वाचण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.