Advertisement
नांदेड -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे.
देगलूर विधानसभेचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण समर्थक मानले जातात. त्यामुळे लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.
विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप झाल्यानंतर जितेश अंतापूरकर हे चर्चेत आले होते. काँग्रेस पक्षाने क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांनावर थेट कारवाई करणं अशक्य असल्याने त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे ठरलं होते.
त्यातच इतक्या दिवसांपासून अंतापूरकर भाजपात जातील अशी चर्चा होती. अंतापूरकर यांच्या राजीनाम्यामुळे या चर्चेला तोंड फुटले आहे.
आज दुपारी जितेश अंतापूरकरांचा भाजपात प्रवेश होईल असे बोलले जात आहे.