Published On : Wed, Feb 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई; फरार नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महतोला घेतले ताब्यात

नागपूर/यवतमाळ: यवतमाळ पोलिसांनी झारखंडमध्ये अनेक गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या नक्षली नेत्याला तुलसी उर्फ दिलीप महतो यास यशस्वीरित्या ताब्यात घेतला आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. हे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानल्या जात आहे.

मिळालेल्या विश्वसनिय व गुप्त माहितीनुसार, तुलसी उर्फ दिलीप महतो हा झारखंडमधून पळून यवतमाळ जिल्ह्यात लपल्याची माहिती मिळाली होती. सदरची माहिती तातडीने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना कळवण्यात आली. त्याअनुषंगाने त्यांनी अचूक विश्वसनिय व गोपनिय यंत्रणेच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेण्याचे आदेश दिले.

Gold Rate
Friday 21 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यांना संशयितावर गुप्तपणे नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान व स्थानिक सूत्रांच्या मदतीने आरोपीला पांढरकवडा, उमरी येथील एका स्टोन क्रशर परिसरात असल्याची माहीती मिळाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले.

संशयित ज्या ठिकाणी लपला होता त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.
संशयिताने बनावट आधारकार्ड सादर करून खोटी ओळख देवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडे कठोर चौकशी केल्यानंतर, आरोपीने स्वतःची खरी ओळख आणि नक्षलवादी कारवायांमधील सहभाग असल्याचा मान्य केला.

तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो (वय ४७ वर्षे ) यांची नक्षलवादी कारकीर्दः- महतो हा 1993 मध्ये झारखंडमधील नक्षली गटात भरती झाला.1997 मध्ये ‘भितीया दलम’ चा विभागीय कमांडर म्हणून नियुक्ती व १२ सशस्त्र नक्षलवाद्यांचे नेतृत्व मिळाले.गुन्हेगारी कारवाया सुरक्षा दलांवर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड अशा अनेक हिंसक कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. झारखंड पोलिसांच्या नोंदींनुसार, तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो हा किमान सात गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे.

१) पोलीस ठाणे मंडू अप क.. २२४ / १९९९ कलम ३०७, ३५३, ४३५, ४४० भादवि. सह कलम २७ शस्त्र अधिनियम आणि ३/४ स्फोटक पदार्थ अधिनियम.
२) पोलीस ठाणे विष्णुगड अप.क्र. ६/१९९८ कलम ३७९, ४११, १२० (ब) भादवि, सह कलम ३० (ii) कोळसा खाण अधिनियम आणि सह कलम ३३ भारतीय वन अधि.
३) पोलीस ठाणे सदर अप क. १७/९८ कलम ३७९, ४११ भादवि. कलम ३० (ii) कोळसा खाण अधिनियम आणि कलम ३३ भारतीय वन अधिनियम.
४) पोलीस ठाणे चौपराण अप क. १/९८ ३० (ii) कोळसा खाण अधिनियम. कलम ३७९, ४११, १२०(ब), ४१४ भादवि, कलम
५) पोलीस ठाणे चर्चा अप क. १/९९ कलम २१६ भादवि सह कलम १७ सीएलए अॅक्ट
६) पोलीस ठाणे चर्चा अप क. ३/९९ कलम ३०२, २०१, १२० (ब), ३४ भादवि अशी गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आले आहे.
आरोपीच्या कबुलीजबाबाची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची पुष्टी करण्यासाठी, यवतमाळ पोलिसांनी झारखंड पोलिसांशी तात्काळ समन्वय साधला. पोलीस अधीक्षक हजारीबाग आणि ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन अंगो यांची ओळख आणि गुन्हेगारी इतिहासाची पडताळणी करण्यात आली.

दरम्यान सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भापोसे) आणि अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. गजानन राजमलु, पोलीस अंमलदार सैयद साजीद, बंडु डांगे, रवि नेवारे, रुपेश पाली, योगेश डगवार, आकाश सुर्यवंशी, राजकुमार कांबळे, देवेंद्र होले, योगेश टेकाम, धनंजय श्रीरामे, महेश वाकोडे या पोलीस पथकाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

Advertisement