पुसद (यवतमाळ)। सायफळ येथील रेती घाट लिलावातील रेती घेवुन जात होता. निम्मे हिस्साने भागीदारीचा करार करून 18 लाख 78 हजार 600 रूपयाचा रेतीच्या मालकाला गंडविण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी रिहाण बाबु खान फारूकी (25) व बाबु खाॅ चाॅंद फारूकी (50) रा. टाकळी, ता. माहुर, जि. नांदेड असे आरोपीतांवर गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पुसद शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून फिर्यादी रेतीचे मालक विशाल शाम सगणे वय 31 वर्षे रा. दिग्रस यांनी दिलेल्या रिपोर्टवरून तालुक्यातील दिग्रस तालुक्यातील सायफळी येथील रेती घाट लिलावातील रेती घेवुन पुसद षहरातील तलाव ले आऊट येथे आले असता निम्मे हिस्साने भागीदारीचा करार करून फिर्यादीस 16 लाख 78 हजार 600 रूपये खणीकर्म विभागात चलनाव्दारे विशाल यांचे बॅक खात्यामध्ये भरावयास लावले होते. मात्र आरोपीने ति रक्कम खात्यात जमा न करता स्वतः जवळच ठेवली व रूपये दोन लाख नगदी घेवुन सदर रक्कमेचा स्वतःचे फायदेसाठी उपयोग करून खर्चही केला. सदरची बाब विषाल सगणे यांच्या लक्षात येताच यांना 18 लाख 78 हजार 600 रू.ने फसवणुक केल्याचे लक्षात येताच आरोपींता विरूध्द तक्रार नोंदविली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपीतांवर 420,34 नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीला एक दिवसाचा पिसीआर मिळाला आहे.