नागपूर मधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचा ट्विटरवरून समाचार घेतला आहे. स्वार्थासाठी सेटलमेंट करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते? संभाजी महाराज धर्मवीर होते असे ट्विट त्यांनी केले आहे.
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ट्विट करून अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा असे नमूद केले आहे. बावनकुळे यांनी ट्विट करीत अजित पवारांवर निशाना साधला आहे.
अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement (सेटलमेंट) करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?
होय #धर्मवीरच !
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.
@AjitPawarSpeaks
((https://twitter.com/cbawankule/status/1609101718331224066?s=46&t=uHHhgb4aQoZy4aW6HnV5DQ ))
दोन दिवसांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा राज्यातील चंद्रपूर व संभाजीनगर येथे दौरा असून त्यासाठी भाजपा प्रदेशाकडून जय्यत तयारीत प्रदेश कार्यालय व्यस्त आहेत.