Advertisement
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघामधून सलग दोन वेळा निवडून आलेले विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना ऐनवेळी पक्षाने तिकीट दिले नाही.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर तुमाने शिंदे गटात सोबत गेले होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण रामटेकची जागा आम्हाला मिळावी अशी आग्रही मागणी भाजपने केली. त्यामुळे रामटेकमधून भाजप उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यानंतर तुमाने नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
मला लोकसभेची उमेदवारी नाकारल्याचे दुःख आहे. मला उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने कॉंग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असे असले तरी मी पक्षावर नाराज नाही. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.