नागपूर : स्थानिक भजपा पक्षाच्या महिला नेत्या सना खानच्या हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे बाहेर येत आहे. या हत्येप्रकरणी पतीसह दोघांना मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक करून नागपुरात आणण्यात आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे हिरण नदीत सनाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे, मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना मृतदेह सापडलेला नाही.
सना खानचा पती आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित शाहू याने आपणच सनाची हत्या केल्याचे काबुल केले.
शाहू म्हणाला की सना आणि त्याचे प्रेमसंबंध होते. त्यांचे लग्नही झाले, पण सनाच्या संशयास्पद स्वभावामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. संशयामुळे ती वारंवार त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायची. 1 ऑगस्टच्या रात्रीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास सना खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने मध्य प्रदेशातील जबलपूरला निघाली. पप्पूच्या म्हणण्यानुसार, जबलपूरला पोहोचल्यानंतरही सनाचा राग कमी झाला नाही. तिथेही ती जोरजोरात रडत होती. तिचा आवाज आजूबाजूच्या लोकांच्या कानापर्यंत पोहोचत होता, त्यामुळे रागाच्या भरात मी सनाच्या डोक्यावर काठीने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मित्राने आरोपी दिनेशला घरी बोलावून त्याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून नदीत फेकून दिला.
आरोपी शाहूने सांगितले की, सनाने त्याला 50 लाख नव्हे तर 5 लाख रुपये व्यवसायासाठी दिले आहेत. या कारणास्तव तिची ढाब्यात भागीदारी होती. आता वाद झाल्याने ती पैसे मागत होती. मी पैसे द्यायलाही तयार होतो. यासाठी मी सनाकडे काही वेळ मागितला होता, मात्र सना तेव्हाच पैशांच्या मागणीवर ठाम होती. ज्यामुळे हा हत्याकांड झाला.
आरोपी शाहू वाळू आणि दारू माफिया असल्यामुळे सना खानचे हत्या प्रकरणही तो मिटवून टाकेल, असे शाहूला वाटत होते. याच जोरावर त्याने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एका पोलिसाला पैसे देऊन आपली कोणतीही माहिती कुणालाही न देण्यास सांगितले.
तो पोलीस पप्पूला प्रत्येक क्षणाची माहिती देत असे. याच कारणावरून नागपूर पोलीस जबलपूरला पोहोचल्यानंतरही तो आपल्या वॅगनआर कारमध्ये लपून बसला होता.
पोलिस मोबाइलद्वारे त्याच्यापर्यंत पोहोचू नयेत, म्हणून फोनही बंद करून अन्य ठिकाणी ठेवला होता. दरम्यान, या घटनेला नाट्यमय वळण देत अपहरणाचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी काही पोलिसांच्या मोबाईलचा तपासही करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नागपूर पोलिसांचा वाढता दबाव पाहून पप्पूला अटक करण्यात आली. पप्पू आणि मित्र दिनेश यांना नागपुरात आणले. दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सनाचा जबरन केला गर्भपात :
सूत्रांच्या माहितीनुसार, 24 एप्रिल 2023 रोजी सना आणि अमित शाहूने कोर्ट मॅरेज केले होते. यानंतर सुमारे दोन महिन्यांनी सना गरोदर राहिली. पप्पूला मुले नको होती. याच कारणामुळे नागपुरात आल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात सनाचा गर्भपात करून घेतला
दरम्यान आरोपी अमित शाहूची पहिली पत्नी पोलीस होती. पोलिस खात्यात असल्याने पत्नीने आरोपी शाहूला अनेकवेळा अवैध धंदे बंद करण्याचा सल्ला दिला होता. अमित शाहू ढाब्याच्या नावाखाली दारूविक्री चालवत असे. त्याच्यात काहीच सुधारणा न झाल्याने तिने घटस्फोट घेतला आणि त्याच्यापासून वेगळी झाली होती.