मुंबई : एका लग्न समारंभात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचते प्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर आल्याने राजकीय चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाल्या. येत्या काळात दोन्ही बंधू सोबत येण्याच्या मागणीनेही जोर धरला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो. अशा भेटी वारंवार घडाव्यात. लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. शेवटी भाऊ आहे, कुटुंब आहे, लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत. ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. शेवटी ठाकरे आहेत. कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे.
अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा. हे शाह यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि ४० चोरांचा एक पक्ष स्थापन झाला. तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शाहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही. तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही, असे राऊत म्हणाले.
मित्र असण्याचा नाही. हा प्रश्न राजकीय आहे. आमच्यात व्यक्तीश: ही नाती आहेत, भावाचे आणि मित्रत्वाचे नाते आहे, त्यात वाद नाही. महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचे मम्हणणे आहे. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकऱ्यांनी हात मिळवणी करू नये. अशा शत्रूशी हात मिळवणी करणे हा महाराष्ट्रातील हुतात्म्याचा अपमान असल्याचा टोला संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना लगावला आहे.