Published On : Mon, Aug 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

योद्धा ढोल ताशा वाद्य पथक, नागपूर गणेशोत्सवात वादनासाठी सज्ज

यंदा पथका’चे आकर्षण
Advertisement

काल दिनांक 25 ऑगस्ट 2024 ला पाथकाची रंगीत तालीम ही सरावाच्या ठिकाणी म्हणजेच चिंच भवन, मनीष नगर बायपास, वर्धा रोड, नागपूर इथे सर्व वादकांच्या उपस्थितीत पार पडली, यात सर्व महिला व पुरुष वादक मंगल वेशात उपस्थित होते, तोच उत्साह, तोच जोश वादकांच्या चेहेऱ्यावर दिसून आला आणि अतिशय उत्साहात सादरीकरण झाले,

तसेच पथकाची बाप्पा चरणी मानवंदना (ढोल ताशा सादरीकरण) ही 1 सप्टेंबर 2024 ला साई मंदीर वर्धा रोड नागपूर याठिकाणी संध्याकाळी ठीक 7:30 ते 9 यावेळेत देण्यात येईल.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गणेशोत्सवात बाप्पांची मिरवणूक म्हटली की, डोळ्यासमोर चित्र येते ती गुलालाची उधळण आणि ढोल ताशाचा गजर. मिरवणुकीचा थाट वाढविण्यासाठी अथक परिश्रम करून एका तालात एका सुरात शिस्तबद्धतेने सराव करतात. या साऱ्यात मात्र ढोल ताशाचा ठेका निराळाच असतो जो प्रत्येकाचे लक्ष वेधणारा ठरतो.महिला व पुरुषांचे योद्धा ढोल ताशा पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
योद्धा ढोल ताशा पथकाची स्थापना 2016 साली झाली असून भूषण ठकरे,मयुरेश हटवार,शंतनू देशपांडे ,यांच्या संकल्पनेतून वाटचाल सुरू झाली. विशेष म्हणजे, शिस्त, वादनाची विशिष्ट पद्धत आणि ताल हे योद्धा ढोल-ताशा पथकांचे वैशिष्ट्य आहे. या पथकात 10 वर्षापासून तर 50 वयापर्यंतच्या सदस्य शाळा, कॉलेज आणि नोकरी-व्यवसाय सांभाळून आपला छंद जोपासत आहे, जे अतिशय कठीण आहे.

गुरुवंदना, शिवताल,महाकाल ताल व जल्लोष ताल राहणार
प्रत्येकाचे डोळे आता आतुरतेने गणेश आगमनाकडे लागले आहे. गणेशोत्सवात बाप्पांना विशेष गुरूवंदना, शिवताल, महाकाल ताल, जल्लोष व कल्लोळ तालाची मानवंदना दिली जाणार असून ज्याचा वेगळाच अंदाज राहणार आहे.

शिस्तबद्धतेने सरावाचे वैशिष्ट्य
या पथकाचा सराव गणेशोत्सवाच्या दोन महिन्यापासून सुरू होत असून रीतसर, एका तालात, एक सुरात अगदी शिस्तबद्धतेने मोहक पद्धतीने सादर केला जातो जो प्रेक्षकांना भूरळ पाडल्या शिवाय राहणार नाही. या पथकाचे वैशिष्ट्य शिस्तबद्धपद्धतीने सादरीकरण केले जाते म्हणूनच याची विशेष मागणी आहे. या कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातून सामाजिक कार्य केले जाते.

एकुण 90 ते 100 सदस्यांचा सहभाग
– वादनाच्या आवडीमुळे त्यांनी ही स्थापना केली. गेल्या दोन महिन्या पासून हे पथक सराव करीत असून गणपतीचे दहा दिवस आणि दुर्गा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सादरीकरण करतात.
– सादरीकरणादरम्यान त्यांच्या ठेक्यातून येणारा नाद आणि ओसंडून वाहणारा जो उत्साह प्रत्येकाचे लक्ष वेधणारा असतो.
– ढोल ताशासह झांज आणि ध्वजसुद्धा या योद्धा मिरवताना आपल्याला पाहायला मिळतील.
– गणेशोत्सवात महिला पुरुषांचे हे ढोल ताशा पथक नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

या पथकामध्ये सौरभ वडसकर,कार्तिक आलोणी,आदेश माहुरे,ऐश्वर्या देशपांडे, प्रफुल काळबांडे, माधव कुऱ्हेकर, शंतनू सायंकार, अंकित हनवते यांनी या वर्षी सराव घेण्याची जवाबदारी उत्कृष्टरित्या पार पडली आणि तसेच स्नेहा भिडे, नीलिमा,सायली,अंबरीश देशपांडे, शिवम, अंकित,आशुतोष पांडे,रोहीत पाध्ये, डिके, श्रीधर गावंडे आणि इतर सदस्य असे एकुण 90 ते 100 सदस्यांचा सहभाग आहे.

Advertisement