Published On : Fri, Apr 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

तुम्ही याच नकली शिवसेनेसमोर नाक रगडायला मातोश्रीवर अनेकदा आलात; संजय राऊतांचे अमित शहांना प्रत्युत्तर

Advertisement


नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. नांदेडच्या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे असे म्हटले. यासोबतच त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावरही टीका केली.या टिकेवरून संजय राऊत यांनी शहा यांच्यावर पलटवार केला.

अमित शाह यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नकली म्हणाले होते. पण मी सांगू इच्छितो की असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही. तुमच्या हातात पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरुन पक्ष खरा की खोटा ठरवणार असाल तर जनता ते सहन करणार नाही. याच नकली शिवसेने समोर तुम्ही नाक रगडायला मातोश्रीवर अनेकदा आला आहात.

२०१९ ला मातोश्रीवर आलात तेव्हा हीच शिवसेना असली होती. आता खोटे गोटे गळ्यात अडकवून फिरत आहात, त्यांना असली म्हणत आहात. मात्र आता हे गोटेच तुमचा कपाळमोक्ष करतील. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हेच दोन खरे पक्ष आहेत. बाकी अमित शाह यांनी जे डुप्लिकेट पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांन दिले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement