नागपुर: आज ६ जुलाई रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात गरजु लोकांना राशन किट वाटप करुण महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या विचार धारे अनुसार लोक कल्याण कार्य अनुसार आम आदमी पार्टी ने राशन वितरण कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम इंगोले लेआउट झिगाबाईटाकली मध्ये घेण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्य समिति संयोजक देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्षय जगजीत सिंह, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर संगठन मंत्री शंकर इंगोले, श्रीमती रुक्मिणी श्याम शवके, अमोल सोनकम्बले, स्वप्निल परिहार हे कार्यकर्ते उपस्तित होते.
आम आदमी पार्टी युवा आघाडी तर्फे श्री शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आपण सर्व शिवप्रेमी, मंडळीं या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
शिवराज्याभिषेका च्या निम्मित १० वर्ष आतील वयोगटातीला मुलांन करीता ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या आयोजनाल मोठ्या प्रमाणात प्रितसाध मिळाला, १०० हुन अधिक बालकांनी या स्पर्धेत भाग घेतला. हे आयोजन आप युवा आघाडी विधर्भ सयोजक पीयूष आकरे, नागपुर युवा संयोजक गिरीश तीतरमारे यांनी पुढाकार घेउन आयोजित केले.