नागपुर – आम आदमी पार्टी मध्य नागपूर चे सिरसपेठ मधील गटारीची समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त गांधीबाग महाल झोन ला नागपूर उपाध्यक्ष निलेश गोयल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
प्रभाग १८ मधील सिरसपेठ मध्ये गटारीची दुर्गम परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिकडे तिकडे तुटलेली झाकने दिसुन येतात. ठेकेदाराने नवीन बनवलेल्या गटारी चे खराब कामामुळे पाईप लाईन मधील लिकेज झाल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची माहिती मनपा मधील लोककर्म विभागाला देऊन ही समस्या सोडविण्यात आलेली नाही.
यावेळी मध्य नागपूर प्रभारी सौ. कृतल आकरे, निलेश गोयल, आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे प्रामुख्यानेउपस्थित होते.