नागपूर : आई रागावल्यामुळे एका २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास घडली. अमित गणेश उईके (वय २६, रा. घर नं. ७९८, सोनी सेंटर समोर, मरारटोली) असे आत्महत्या केल्याच्या युवकाचे नाव आहे.
अमितने बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तो घरीच राहायचा. तो काहीच कामधंदा करीत नसल्यामुळे त्याची आई सीमा गणेश उईके (वय ५०) यांनी त्याला रागावले. तु मोठा झाला काहीतरी कामधंदा कर, असे त्या अमितला म्हणाल्या.
मात्र आईने रागावल्याच्या रागातून अमितने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद म्हात्रे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.