नागपूर: २० वर्षापासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम व सेवा नियमित करण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान वेतन मिळन्यासाठी महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या वतीने नागपूर अधिवेशनात विधानसभेवर धड़क मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे उत्तम मधुमटके, महेश गावंडे, रवि बोंडे, कमलेश गजभिये,रजनी निमजे यांच्या नेतृत्वात निघाला संघटनेच्या प्रमुख मागण्या क्षयरोग कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे, समान काम, समान वेतन, पी.एफ लागू करणे, वैद्यकीय रजा, मातृत्व रजा,६महीने पगारी, वैद्यकीय क्लेम या मागन्यासाठी संघटना २० वर्षापासून संघर्ष करीत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय येऊन सुद्धा महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरोधात काढण्यात आलेल्या धड़क मोर्चात नागपूर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके,महासचिव आलोक कोंडापुरवार व युवक कांग्रेस चे कार्यकर्ते सुद्धा शामिल झाले. महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके व महासचिव आलोक कोंडापुरवार यांना पोलिसांनी उद्धटपने वर्तन केले पोलिसांची व् युवक कांग्रेस पदाधिकाऱ्यांची शाब्दिक चकमक झाली आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बड्या अधिकाऱ्याने सांगितले यांचा की यांचा फ़ोटो काढ़ा तसेच नगरसेवक अध्यक्ष बंटी बाबा शेळके व् महासचिव आलोक कोंडापुरवार व कार्यकत्यांना आत मधे टाका. असा आदेश दिला युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले व त्यांनी धिक्कार केला पोलीस विभागाची अशी अरेरावी तेही एका लोकप्रतिनिधिला ही निंदनीय आहे राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्र्याचे त्यांना अभय आहे हे सिद्ध होते या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला मुख्यमंत्र्यानेच आमची सरकार आली तर तुमच्या मागण्या मान्य करु असे संघटनेला आश्वासन दिले होते पण ते सरकार आता मारण्याची धमकी देत आहे वेळोवेळी या मुख्यमंत्र्यानी आपला पवित्रा बदल्ला आहे. विरोधात असताना पोकळ आश्वासन देऊन सहानुभुति मिळून सतेवर आले.आता त्यांना सतेचा माज चढ़ला आहे.त्यांचा माज उत्तरवायला नागपूर लोकसभा युवक कांग्रेस मैदानात उतरली आहे.
प्रशासनाने प्रतिनिधिची चर्चा करून संघटनेचे एक प्रतिनिधि मंडल आरोग्यराज्यमंत्र्यानी माझ्या अधिकारात या मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. हया मागण्या मी आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री यांचे समोर ठेवतो असे आश्वासन दिले. पण कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. कर्मचाऱ्यांनी स्पष्ठ भूमिका घेऊन राज्यमंत्राना खड़साऊन सांगितले. की १ महिन्यात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करून मार्च मधील मुंबई अधिवेशनात मोर्चा काढून सरकारला स्वस्थ बसु देणार नाही. मोर्चात शशिकांत वालदे, सचिन देहनकर, रूपेश सैजारे, रुपाली कामदी, विजया रामटेके, सोनाली वानखेड़े, सुरेंद्र डोळे, नंदकिशोर भिवगड़े, रितेश दातिर, शैलेन्द्र मेश्राम, अमोल जगताप, वर्षा भांगे, ललिता कामडी,रोशन धवले, श्रीकांत पाटिल, नेहा भुसारी, अरविंद चव्हाण, सोनाली सावरकर, प्रवीण वाघ, अमित खंगार, रणजीत घोड़मारे,हेमंत कातूरे, सौरभ शेळके,स्वप्निल ढोके,आशीष लोनारकर,पूजक मदने,शाहबाज चिस्ती,शेख अजहर,फरदीन खान,अखिलेश राजन,हर्षल धुर्वे,नीलेश शिंदे,पुष्पक मढ़ने,राकेश निकोसे,नयन तरवतकर,स्वप्निल बावनकर,प्रतिक वैद्य,आसिफ अंसारी,तुषार मदने, इत्यादि कर्मचारी व युवक कांग्रेस कार्यकर्ते सहभागी होते.