कामठी: सत्ताधारी भाजप सरकारच्या कार्यकाळात दिवसेंदिवस होत असलेली महागाई येथिल सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवणारे असून जीवनावश्यक वस्तू असलेली पेट्रोल डिझेल च्या दरवाढी मुळे वाहतुकदारांचे कंबरडे मोडले असून आर्थिक बजेट कोलमडले आहे तेव्हा पेट्रोल डिझेल वरील झालेली दरवाढ कमी व्हावि तसेच दरवाढ कमी न झाल्यास भाजप सरकार विरोधात तीव्र आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा आज युवक कांग्रेस च्या वतीने येथील पेट्रोलपंप वर केलेल्या निषेध मोर्च्यातून करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव अनुराग भोयर, कामठी विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष फैसल नागानी, महासचिव सलामत अली, निखिल फलके, सलमान खान, सिराज भाटी, शिरेयांश खन्देलवाल, संदीप जैन, रशीद अन्सारी, आशिष भोयर,हरीश मदनकर,नितु कुंभलकर, शुभम लोणारे, सुरेय्या बानो, राजमनी तालेवार, नजमा खातून,तहेरा बानो, शमशूं न निशा, अफसर खान, इब्राहिम खान,प्रतीक शर्मा, सुलतान अली, जावेद अब्बास, शशिकांत रामटेक, सुलतान हैदरी, रोहित मेश्राम आदी उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी