Published On : Tue, Jun 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

युवकांनी कौशल्य आत्मसात करून करून स्वावंलबी होऊन रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
Advertisement

नागपूर : आपल्या जीवनामध्ये कुठलेही कौशल्य आत्मसात करून त्याचा जीवनात उपयोग करून स्वावंलबी होऊन स्वयंरोजगाराची कास धरावी त्याचप्रमाणे रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्रशासनाच्या सेवांमधे नव्यानं भरती झालेल्या 70 हजार तरुणांना नियुक्तीपत्रं देशातील 43 ठिकाणी दुरदृश्यप्रणालीद्वारे आज प्रदान करण्यात आली. नागपूरच्या धरमपेठ येथील वनामती संस्थेच्या सभागृहात रोजगार मेळ्याअंर्गत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली ,त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय महाव्यवस्थापक वैभव काळे उपस्थित होते.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहराच्या गरजेच्यानुसार नागपूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पुढील वर्षात एक लाख युवकांना मिहानमध्ये रोजगार मिळणार यामुळे नागपूरचे अर्थव्यवस्था सुद्धा निर्माण होईल अशी आशा गडकरी यांनी यावळी व्यक्त केली.रोजगार आणि नोकरी यात फरक असून रोजगारामध्ये आपण जे कौशल्य विकसित केले आहे त्याच्या आधारावर आपण काय करू शकतो याचा आपण विचार केला तर, अनेक नवकल्पना आपल्याला येऊ शकतात असे देखील त्यांनी स्पष्ट केलं. बांबू पासून पांढरा कोळसा निर्मिती संदर्भात त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीपासून रोजगार मिळेल एनटीपीसी सारखे सार्वजनिक उपक्रम क्षेत्र या कोळश्यापासून निर्माण होणाऱ्या पिलेटस्‌ सुद्धा विकत घेत आहेत असं त्यांनी सांगितलं. गडकरी यांनी सांसद आदर्श ग्राम पाचगाव येथे टाकाऊ कपड्यापासून चिंध्यापासून उत्तम गालीचे तयार करणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली .

या प्रशिक्षणातून महिला स्वयंरोजगारांच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करत असल्याचा त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत दाखल झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिनिधिक स्वरूपात 5 जणांना नियुक्ती पत्राचे वितरण केले. या कार्यक्रमात 239 जणांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ,स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया , पंजाब नॅशनल बँक या राष्ट्रीयकृत बँकेत दाखल झालेले परिक्षावधीन अधिकारी ,सहायक , बँक व्यवस्थापक , मध्य रेल्वे, त्याचप्रमाणे वीएनआयटी नागपूर मध्ये दाखल झालेल्या विविध कर्मचाऱ्यांचा समावेश होता .
*

Advertisement
Advertisement