Advertisement
नागपूर : मौदा पोलिसांनी रविवारी सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना एका तरुणाला रंगेहात पकडले. शोएब शेख (२३) असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन परिसरातील रहिवासी आहे.
माहितीनुसार, पोलिसांना गस्तीदरम्यान रविवारी दुपारी पावड डोना रोडवरील गोपाल कंपनीजवळ शोएब गांजा ओढत असताना दिसला.
याचदरम्यान पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. पोलिसांनी चिल्लम आणि आगपेटी जप्त केली. आरोपी विरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलम २७ अन्वये गुन्हा दाखल केला.