कामठी -महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे नक्षलग्रस्त भामरागड परिसरात कार्यरत असलेले सी. आर. पी. एफ. जवान जे कोविड योद्धा म्हणून कार्य करतात असे मनीष तितरमारे यांच्या हस्ते युवा चेतना मंच तर्फे राज्याभिषेक करण्यात आले .
तत्पूर्वी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले व सकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना विधीवत पंचामृताने राज्याभिषेक व पूजन करण्यात आले. या प्रसंगी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले महाराजांची आरती व सामूहिक शिवस्तुती घेऊन हिंदवी स्वराज्य दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले व प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या राज्याभिषेक सोहळ्याचे संयोजन मयुर गुरव कुणाल सोलंकी भूषण ढोमने कुणाल जाधव यांनी केले याप्रसंगी प्रा. पराग सपाटे, अक्षय खोपे, बंटी पिल्ले, अमोल नागपुरे, श्रीकांत अमृतकर, अतुल ठाकरे, शिव कुशवाह, लीलाधर राखुंडे, विजय आगरकर, रुपेश चकोले, अमोल श्रावणकर, कमलाकर नवले, आशिष हिवरेकर, उमेश गिरी आदी मावळे प्रामुख्याने उपस्थित होते.