नागपूर/कन्हान: नागपूर जिल्हा सह देशाला समृद्धीकडे नेणारे लोकनेते आदरणीय नितीन गडकरी यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे कान्द्री गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी केक कापुन व आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर जिल्ह्याचे महामंत्री अतुल हजारे यांच्या नेतृत्वात केले असून कार्यक्रमाला भाजप अपंग आघाडीचे अध्यक्ष हिरालाल गुप्ता, भाजयुमो तालुक्याचे महामंत्री सुरेंद्र बुधे, भाजप कान्द्री शहर अध्यक्ष महादेव किरपाण,प.प.ए.से. मंडळ कान्द्री चे अध्यक्ष रामभाऊ सावरकर, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा हर्षाताई नागपुरकर, ग्राम पंचायत टेकाडी को.ख उपसरपंचा मीनाक्षी बुधे, कान्द्री ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चकोले, जेष्ठ भाजप कार्यकर्ते महेंद्र पलीये,वासुदेव आखरे,भाजप कार्यकर्ता लीलाधर बर्वे,संकेत चकोले, विनोद कोहळे, सौरभ पोटभरे, लोकेश अंबाळकर,वीर सिंह, रोहित चकोले,अमरदीप कापसे,प्रवीण आखरे,प्रवीण हिंगे,किरण चकोले यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान केले.