– लाखो बेरोजगार युवक खोका सरकार ला धडा शिकवतील!- हर्षल काकडे
वाडी : -वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प “खोके सरकारच्या” हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे १ लाख तरुणांना रोजगाराच्या संधीला मुकावे लागले.
महाराष्ट्रासाठी ही अत्यंत खेदाची बाब असुन शिंदे व गुजरात प्रेमी फडणवीस याला दोषी असल्याचा आक्रोश व्यक्त करून महाराष्ट्रीयन युवकांसोबत या खोके सरकारची ही धोकेबाज़ी असल्याचे सांगून राज्यातील सुशिक्षित युवक हा धोका विसरणार नसल्याचे मत युवा सेनेचे विभागीय सचिव हर्षल काकडे यांनी वाडी येथे संपन्न झालेल्या निषेध आंदोलन दरम्यान व्यक्त केले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेश व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव हर्षल काकड़े यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी १२ वा.वाडी स्थित खडगाव मार्गावरील शिवाजी स्मारका समक्ष शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ता एकत्रित आले.छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला अभिवादन व माल्यार्पण करून शिवसैनिकांनी शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली.आंदोलना नंतर मोठ्या संख्येने उपस्थित युवा व शिवसैनिकांनी निषेध फलकावर स्वाक्षऱ्या करून आपला निषेध व्यक्त केला.
या निषेध आंदोलनात युवासेना विभागीय सचिव हर्षल काकडे सह संतोष केचे,संजय अनासाने,अखिल पोहनकर, विजय मिश्रा,सुबोध जांभुळकर,धनराज लाडगे,सचीन बोंबले,शुभम डवरे,आदर्श अभ्यंकर,किशोर ढगे,कमल तायडे,
बावनकर,राजु शेळके,निहाल धानोरकर,विग्नेश तेलुटे,यश हरने,तुषार वडस्कर,राकेश निखारे,