नागपूर: ब्रिटिश राजवटीत उभारण्यात आलेले ‘झीरो माईल स्मारक’ ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरच्या जुन्या मॉरेस कॉलेज समोर उभारण्यात आलेले हे स्मारक देशाच्या केंद्र स्थानी असल्याने ते भौगोलिक आणि व्यावसायिक दळणवळणाच्या दृष्टीने देखील फार महत्वाचे ठरते. सध्या या ठिकाणी नागपूर मेट्रो स्टेशनचे बांधकाम करण्यात येत आहे. प्रस्तावित इमारत हि २० मजली ची राहणार आहे.
“झीरो माईल” मेट्रो स्टेशन हे व्यावसायिक, खाजगी सुविधा आणि रहिवाश्यांसाठी रेसिडेंशियल अपार्टमेंट अश्या अनेक दृष्टीकोणातून उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात हे ठिकाण फक्त “झीरो माईल” स्मारक म्हणूनच नाहीतर ऐतिहासिक मेट्रो स्टेशन म्हणून जगप्रसिद्ध राहणार आहे. शहराचे पर्यटन दृष्टीकोणातून महत्व वाढत राहावे व भविष्यात त्याचा फायदा नागपूरकरांना मिळावा या उद्देशाने नागपूर मेट्रोची चमू सतत प्रयत्नशील आहे.
विसाव्या शतकाच्या अखेरीस आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीपासून आज मेट्रो स्टेशनचे स्वरूप दिवसें-दिवस आधुनिक होत चालले असून व्यावसायिक दृष्टीकोणातून ते फायद्याचेही ठरत आहे. शहरात निर्माणाधीन असलेले हे स्टेशन त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. प्रस्तावित मल्टी फंक्शनल ‘झिरो माईल स्टेशन’ येथे हेरिटेज वॉक, मार्केट प्लाझा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मनोरंजनाची साधने इत्यादी सुविधा प्रवाश्यांसोबतच इतर सर्वांसाठी उपलब्ध राहणार आहे.
ऐतिहासिक व सांस्कृतिक शिल्पचित्र व पेंटिंग्सच्या सहाय्याने स्टेशनचे आकर्षक रूप दिसेल असे बांधकाम करुन टाइम लाइन वॉल, लैंडस्केप फॉर्म ची व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त स्टेशन परिसरातील मार्गावर सुंदर रोपटयांची लागवड करुण ते येन्या जाणाऱ्यांचे आकर्षनाचे केंद्र ठरेल. तसेच पाणी वाचवण्यासाठी व पाण्याचे पुनःउपयोगासाठी जलसंवर्धन सिंचनाचे प्रकार येथे बघायला मिळणार आहे. एकूणच मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरीकांनपर्यंत विविध उपक्रमांना प्रोत्साहन देणारे असे ‘झिरो माईल मेट्रो स्टेशन’ राहील.